छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): नगरसेवकांच्या महापालिकेतील २२ अपात्रतेसंदर्भातील प्रकरण आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, या निर्णयाची सूत्रे आयुक्तांच्या हाती केंद्रित झाली आहेत. विविध कारणांवरून दाखल तक्रारींची चौकशी पूर्ण झाली असून, आता संबंधितांना सुनावणीची संधी देत व त्यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेवर राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच अल्पावधीतच
पुरावे व अहवालानंतर अंतिम निर्णय
अपात्रतेपूर्वी सुनावणी घेणे बंधनकारक असल्याने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या टप्प्यात सादर होणारे पुरावे व विभागीय अहवालाच्या आधारे आयुक्त अंतिम निर्णय घेणार आहेत.
निवडणूक विभागाकडे तक्रारींचा पाऊस पडला होता. विविध पक्षांतील नगरसेवकांवर अनधिकृत बांधकामे उभारणे, मनपा मालकीच्या जागांवर अतिक्रमण करणे तसेच दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. काही तक्रारींसोबत छायाचित्रे व दस्तऐवज सादर करण्यात आले असले तरी अनेक अर्जामध्ये पुराव्यांचा अभाव असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्राथमिक छाननीनंतर ही सर्व प्रकरणे नगररचना विभाग आणि जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे तपासासाठी सोपविण्यात आली होती.
या विभागांनी आपला अहवाल सादर केल्यानंतर आता पुढील कारवाईसाठी प्रशासनाला मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे अपात्रतेच्या निर्णयाची जबाबदारी आता पूर्णतः आयुक्तांवर आली आहे. दरम्यान लवकरच सुनावणीच्या तारखा निश्चित करून संबंधित नगरसेवकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक प्रकरणातील पुरावे, कागदपत्रे आणि विभागीय अहवालांचे बारकाईने परीक्षण करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












